स्वत:चे लॉगीन आयडी (PRN क्रमांक) आणि गोपनीय पासवर्ड स्वत:च्या अर्जाशी संलग्न केलेल्या मोबाईल फोनवरील OTP सह वापरून ‘अर्जातील माहिती अद्ययावत करणे’ या पर्यायाचा उपयोग करून उमेदवारांना त्यांच्या अर्जामधील ठराविक माहितीत वेळोवेळी होणारे बदल त्यांच्या अर्जात सुरक्षितपणे समाविष्ट करून अर्ज सदैव अद्ययावत ठेवता येतील. माहितीत बदल करताना प्रत्येक वेळेस उमेदवारास OTP पाठविण्यात येईल व तो माहिती बदल करताना बरोबर समाविष्ट केला असल्यासच माहितीत बदल होईल. बदल करण्यास अनुमती असलेल्याच माहितीत बदल करता येईल पण उमेदवारांनी कोणतीही माहिती बदल करताना त्या माहितीची पुष्टी करण्यासाठी पूरक दस्तऐवज आपल्या जवळ आहे व ते संबंधित अधिकारी वर्गाला दाखविता येईल याची दक्षता घ्यावी.

उमेदवाराने कोणती माहिती किती वेळा बदलली याची महापदभरती मधील प्रणालीत पूर्ण तपशील ठेवला जाईल व तो उमेदवाराच्या निवडीबाबत निर्णय घेताना निवडसूची मध्ये योग्य त्यावेळी नाव आल्यानंतर पूर्णपणे तपासला जाईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.