महापदभरती पोर्टल वर सर्व प्रवर्गातील उमेदवारांना गट-ब, क आणि ड संवर्गांतील पदभरतीसाठी उमेदवाराला फक्त एकदाच नोंदणी करायची आहे व ती नोंदणी उमेदवाराचे वय 45 वर्ष पूर्ण होईपर्यंत ग्राह्य धरण्यात येईल. सामाईक ऑनलाईन परीक्षेसाठीचा अर्ज व त्यातील मिळालेले गुण हे उमेदवार ज्या वर्षात अर्ज करत आहे त्या वर्षाच्या 31 डिसेंबर पर्यन्त वैध असेल व मुख्य परीक्षेसाठी केलेला अर्ज हा ज्या पदासाठी अर्ज केला असेल त्या पदासाठी निवड प्रक्रिया पूर्ण होईल तो पर्यंत वैध असेल.