1. प्रत्येक उमेदवारास मिळणारी प्रश्नपत्रिका इतर सर्व उमेदवारांच्या प्रश्नपत्रिकेपेक्षा भिन्न स्वरुपाच्या असतील पण समान काठीण्य पातळीच्या असतील.
  2. उमेदवाराने ऑनलाईन परीक्षेचे लॉगीन केल्यानंतर त्याला एकावेळी एकच प्रश्न या पद्धतीने ते परीक्षेचा कालावधी संपेपर्यंत एकापाठोपाठ एक असे सादर होत राहतील.
  3. म्हणजेच प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न एका सलग प्रश्नपत्रिकेच्या स्वरुपात एकदम उघड न होता फक्त एकच प्रश्न एकावेळी संगणकाच्या पडद्यावर दर्शवला जाईल.
  4. तो प्रश्न सोडविल्यानंतरच किंवा तो न सोडविण्याचा निर्णय संगणकास दिल्यानंतरच पुढचा प्रश्न दर्शवला जाईल.
  5. सोडविलेले किंवा न सोडविलेले प्रश्न पुन्हा बघण्याची व त्यांची पूर्वी दिलेली उत्तरे नंतर बदलण्याची किंवा उत्तरे दिली नसल्यास ती नंतर देण्याची मुभा उमेदवारास नसेल.
  6. परीक्षा केंद्रात एमकेसीएलने नेमलेले योग्य ते प्रशिक्षित पर्यवेक्षक उमेदवारांच्या मदतीला असतील परीक्षेदरम्यान उमेदवाराने काटेकोरपणे शिस्तपालन करणे आणि संबंधित केंद्र पर्यवेक्षकास सहकार्य करणे अपेक्षित आहे.
  7. परीक्षा केंद्रात मोबाईल फोन, ब्लूटूथ उपकरणे, वेअरेबल डिव्हायसेस, इ. सोबत बाळगण्यास सर्व उमेदवारांस सक्त मनाई असेल.
  8. परीक्षा केंद्रातील सर्व हालचालींवर पाळत ठेवणारे व सुदूर नियंत्रणाची (remote controlची) सुविधा असलेले सर्व्हेलिअन्स कॅमेरे व सुरक्षित व्हिडीओ रेकॉर्डिंग प्रणाली कार्यान्वित केलेली आहे.
  9. प्रत्येक संगणकावरील कॅमेऱ्याच्या सहाय्याने काही ठराविक सेकंदांनी उमेदवाराची व त्याच्या पार्श्वभूमीवरील हालचालींची छायाचित्रे सुरक्षितपणे रेकॉर्ड केली जाणार आहेत व छायाचित्रे आक्षेपार्ह असल्यास उमेदवारास तत्काळ ताकीद देण्याची व त्याचा / तिचा निकाल राखून ठेवण्याची सॉफ्टवेअर सुविधा सुद्धा कार्यान्वित असेल.
  10. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर ‘सबमिट’ करताना अथवा तो प्रश्न न सोडवता ‘स्किप’ करताना उमेदवाराचे छायाचित्र व त्यावेळी त्याने स्किप केलेला प्रश्न अथवा दिलेल्या उत्तरासह सोडविलेला प्रश्न दर्शविणारे त्याच्या संगणक पडद्याचे स्पष्ट छायाचित्र यांचे सुरक्षितपणे रेकॉर्ड करण्याची सुविधा प्रणालीमध्ये असणार आहे जेणेकरून उमेदवारास परीक्षेनंतर हा ऐवज त्याच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देता येईल व त्यास त्याची उत्तरे आदर्श उत्तरांशी ताडून मिळालेले गुण योग्य आहेत किंवा कसे हे पाहता येणाऱ आहे.