- उमेदवाराचे पूर्वपरीक्षेतील गुण त्याने पूर्वपरीक्षा दिलेल्या कॅलेंडर वर्षाच्या अखेरच्या दिवसापर्यंत (31 डिसेंबर पर्यंत) वैध राहातील. त्यानंतर ते गुण व त्याद्वारे मिळालेला योग्यता क्रमांक व्यपगत होतील.
- उमेदवाराचा ‘महापदभरती पोर्टल’वरील अर्ज मात्र त्याच्या / तिच्या प्रवर्गनिहाय वयोमर्यादेपर्यंत वैध समजण्यात येईल.
- प्रत्येक नव्या कॅलेंडर वर्षात प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील पदांसाठी इच्छुक उमेदवाराचे अर्ज दाखल करण्याच्या वेळचे त्या कॅलेंडर वर्षात मिळविलेले पूर्वपरीक्षेतील ताजे गुण सदर जाहिरातीनुसार होणाऱ्या त्याच कॅलेंडर वर्षातील ‘विभागवार-पदनिहाय मुख्य ऑनलाईन परीक्षे’साठी विधीग्राह्य असतील.
- त्या पूर्वीच्या कॅलेंडर वर्षातील गुण नवीन वर्षाच्या 1 जानेवारीस व्यपगत होतील.