- गट-ब, क आणि ड संवर्गांतील पदभरतीसाठी घ्यावयाच्या तीन भिन्न सामाईक ऑनलाईन पूर्वपरीक्षांसाठी तीन भिन्न / गटनिहाय प्रश्नमंजुषा असतील.
- प्रत्येक गटाच्या सामाईक ऑनलाईन पूर्वपरीक्षेसाठी असलेल्या सर्व विषयांसाठी मिळून किमान 5000 (पाच हजार) प्रश्नांची सामाईक प्रश्नमंजुषा व संलग्न आदर्श उत्तरमंजुषा तयार करण्यात आलेली आहे.
- प्रश्नमंजुषेतील सर्व प्रश्न हे समान काठिण्य पातळीवरील असतील. विविध विषयनिहाय तज्ज्ञांच्या गटांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक प्रश्नाची गुणवत्ता व अचूकता काटेकोरपणे सुनिश्चित केलेली आहे.
- सदर प्रश्नमंजुषा व आदर्श उत्तरमंजुषा ‘महापदभरती पोर्टल’वर उमेदवाराच्या लॉगिनमध्ये प्रकाशित करण्यात करण्यात येईल जेणेकरून उमेदवारांना पूर्वपरीक्षेची तयारी करण्यासाठी तिचा उपयोग होईल.